मुंबई – 90 च्या दशकातील प्रसिद्ध नाव असलेल्या रवीना टंडनच्या सौंदर्य आणि स्टाईलची चाहत्यांना आजही भुरळ पडते. मोठ्या पडद्या[पासून दूर गेलेल्या रवीनाने नुकतच साऊथ चित्रपट केजीएफमधून सिनेसृष्टीत जोरदार पुनरागमन केलं. सध्या रविना तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर तिच्या मुली सोबतच्या एका सेल्फीमुळे चर्चेत आली आहे. रविणाची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
राशाने राविनासोबत एक मिरर सेल्फी घेतला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या सेल्फीमध्ये आई आणि मुलगी दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. राशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रवीना टंडनसोबत ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे.
या फोटोमध्ये आई रवीना जांभळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे, तर राशा सुंदर केशरी रंगाचा सूट परिधान करून आरशासमोर सेल्फी घेताना दिसून येते. दोघी माय लेकींचे फोटो इतके खूपच सुंदर आहेत की चाहत्यांनी दोघींचे कौतुक केले आहे.
चाहत्यांनी या फोटोवर जोरदार कमेंटबाजी केली आहे. संतूरची जाहिरात करा असा सल्ला एकाने दिला आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने दोघी बहिणी बहिणी असल्यासारखे वाटत असल्याचे म्हंटले आहे.
View this post on Instagram
राशा लवकरच बोलीवूड दणक्यात डेब्यू करणार आहे. तिच्या चित्रपटाच्या कथानकाचे काम पूर्ण झाल्याचे देखील समोर आले होते. पुढील वर्षी अभिषेक कपूरच्या नवीन चित्रपटातून राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. ज्यामध्ये ती अमन देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.