शिरगाव, (वार्ताहर) – शिरगाव येथे सुरू असलेल्या दारू भट्टीवर पोलिसांनी छापा घातला. सोमवारी (दि. १९) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक योगेश जालिंदर नागरगोजे (वय 36) यांनी सोमवारी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एका 22 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने शिरगाव गावाच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोकळ्या जागेत दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली होती. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक लाख 21 हजार रुपये किमतीचे गूळ मिश्रित रसायन पोलिसांनी मिळून आले. पोलीस हवलदार खिलारे याबाबत अधिक तपास करीत आहे.