नवी दिल्ली – केरळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे आहे. यासाठी सर्वच पक्षांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी होत आहे. अशातच इडुक्कीमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.
जॉयस जॉर्ज म्हणाले, केवळ मुलींच्याच कॉलेजमध्ये जायचे. तिथे जाऊन मुलींना बेंड कसे व्हायचे हे शिकवणार, हेच राहुल गांधी यांचा निवडणूक प्रचार आहे. मी मुलींना सांगतो, असे करू नका. राहुल गांधींसमोर ताठ उभे राहा, असे त्यांनी म्हंटले आहे.
This moron Joyce George of @cpimspeak referring to @RahulGandhi ‘s St Teresa college says don’t kneel down or bent infront of Rahul,be careful he is not married!
Is this endorsed by @SitaramYechury or comrade @vijayanpinarayi ?
Stooping to such low?
It’s clear now CPM Vl lose pic.twitter.com/STEjBhqAY7
— Vijay Thottathil (@vijaythottathil) March 30, 2021
राहुल गांधी अविवाहित आहेत. त्यामुळेच ते अशा प्रकारच्या कार्यक्रमात जात असतात, असेही जॉर्ज म्हणाले आहेत.
जॉयस जॉर्ज यांच्या विधानावर आता काँग्रेसने आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.
We condemn this misogynistic comment by Joyce George.
It’s clear @cpimspeak is feeling the heat of losing elections https://t.co/IZWlV4j0xQ— Congress Kerala (@INCKerala) March 30, 2021
दरम्यान, केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून राज्यात येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल येत्या 2 मे रोजी लागणार आहे.