Success Story : पतीला शेतीत मदत म्हणून त्यांनी गांडूळ खत बनवायला सुरुवात केली. आपल्या सोबत अनेक महिलांना रोजगार देखील दिला.आज त्यांचे उत्पन्न वर्षाला तब्बल 7- 8 लाखांवर पोहचले आहे. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील पूनम सिंह यांची. युपीमधील सुलतानपूर जिल्ह्यातील लंबुआ ब्लॉकमधील हड़हा गावात राहणाऱ्या पूनम सिंह आज संपूर्ण परिसरातील महिलांसाठी एक आदर्श बनल्या आहेत. पूनम गेल्या ३ वर्षांपासून कंपोस्टचे उत्पादन करत आहेत.
पूनम सांगतात,”3 वर्षांपूर्वी आम्ही गावातील काही महिलांना सहभागी करून गांडूळ खत तयार करण्याचे काम सुरू केले. आमचे पती २ ते ३ एकरात गहू आणि वाटाणा पिकवतात. पण आजच्या काळात रासायनिक खते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. मात्र लोकांना आजारांनी ग्रासलेले पाहून शेतीसाठी सेंद्रिय खते बनवण्याचे त्यांनी ठरवले असल्याचे सांगितले. | UP farmer women Success Story
25 किलो गांडूळ खताची किंमत 700 रुपये
पूनम सांगतात,”सर्वप्रथम आम्ही गांडुळ खत तयार करून ते आमच्या शेतात टाकले, त्यामुळे आमच्या गव्हाचे पीक चांगले आले. हळूहळू आम्ही एक व्यवसाय म्हणून पुढे नेण्याचा विचार केला. पूनम पुढे म्हणाल्या की, गावातील 11 महिलांनी मिळून आम्ही गांडूळ खत बनवायला सुरुवात केली. त्याचे परिणाम दिसू लागले. त्याची मागणी वाढतच चालली असल्याचे ते सांगतात. | UP farmer women Success Story
आज शेतकरी मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचा वापर करून कमी खर्चात आपल्या पिकांचे उत्पादन वाढवत आहेत. महिला शेतकरी पूनम पुढे म्हणाल्या की, 25 किलो गांडूळ खताची बॅग 600 ते 700 रुपयांना विकली जाते. त्यांनी सांगितले की आम्ही दररोज 2-3 क्विंटल गांडूळ खत तयार करतो आणि ते अगदी सहज विकले जाते. | UP farmer women Success Story
पूनम सांगतात आधी त्या शेतात केवळ शेण खत आणि रासायनिक खते वापरत असत. परंतु गांडूळ खत निर्मिती वेगाने होत असल्यामुळे त्यांनी आता शेतात गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे. शेतीला तर याचा फायदा होतोच परंतु याचे आता व्यवसायात रूपांतर झाल्यामुळे अनेक महिला आपल्या कष्टातून घरखर्च देखील भागवत असल्याचे पूनम यांनी सांगितले.