राहुल गांधींचा राजीनाम्याचा निर्णय धाडसी : प्रियंका गांधी-वढेरा

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे पण तो स्वीकारला गेला नसल्याने त्याविषयी शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. तथापी आज स्वता राहुल गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. या निर्णयाचे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी समर्थन केलं आहे. असा निर्णय घ्यायला धाडस लागते असे प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या की, असा निर्णय घ्यायला धाडस लागतं. तसेच माझा या निर्णयाला पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेस कार्यकारीणीला लिहीलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आपल्या या महान देशाच्या जीवनमुल्यांशी जोडल्या गेलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी या पक्षाचा आभारी आहे. हा माझ्यासाठी एक सन्मान होता. माझ्यावर माझ्या देशाच्या आणि पक्षाच्या प्रेमाचे मोठे कर्ज आहे. त्यांचे हे पत्र म्हणजेच त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचे शिक्कामोर्तबच मानले जात

Leave A Reply

Your email address will not be published.