नवी दिल्ली – देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेलची दरवाढ आणि रोजगाराच्या समस्येमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. मोदी दर रविवारी आपल्या ‘मन की बात’मधून देशाला संबोधित करत असतात. हाच धागा पकडून राहुल यांनी हॅशटॅग ‘रोज सुबह की बात’ म्हणत मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, पंतप्रधानांनी रोज काय करायचं अशी एक लिस्ट बनवली आहे. या लिस्टमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे रेट किती वाढवू, लोकांच्या वाढलेल्या खर्चावरील चर्चांना कसं थांबवू, तरुणांना नोकरीचे खोटे स्वप्न कसे दाखवू, आज कोणती सरकारी कंपनी विकायला काढू, आणि शेतकऱ्यांना कसं हतबल बनवू, हेच आहे.
प्रधानमंत्री की Daily To-Do List
1. पेट्रोल-डीज़ल-गैस का रेट कितना बढ़ाऊँ
2. लोगों की ‘खर्चे पे चर्चा’ कैसे रुकवाऊँ
3. युवा को रोज़गार के खोखले सपने कैसे दिखाऊं
4. आज किस सरकारी कंपनी को बेचूँ
5. किसानों को और लाचार कैसे करूँ#RozSubahKiBaat— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 30, 2022
मागील चार ते पाच दिवसांत पेट्रोलचे दर पाच रुपयांहून अधिक वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून पेट्रोलचे दर 115 च्या जवळ पोहोचले आहेत. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर वाढतच आहेत.