मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोमीच्या पोस्टमुळे बॉलिवूड मध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टमधून सोमीने ‘बॉलिवूडमधील हार्वे वेनस्टाईन’ ला इशारा दिला आहे.
सोमी अलीने आपल्या इन्स्टावर पोस्टी लिहली त्यामध्ये ‘बॉलीवूडचा हार्वे वेनस्टाईन! तुझं सत्य लोकांसमोर येईल. जसे ऐश्वर्या रायनं केले तसेच तु ज्या महिलांचे शोषण केले त्या एक दिवस बाहेर येतील आणि तुझं सत्य सांगतील.’ सोमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसत आहेत. पण या दोघांचा चेहरा दिसत नाही. तिने उल्लेख केलेला बॉलीवूडचा हार्वे वेनस्टाईन हा नक्की कोण आहे? याचा अद्याप उलघडा झाला नाही.
अभिनेत्री सोमी अली आणि सलमान खान काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुद्धा त्यावेळी रंगली होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.