नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बुधवारी हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीटकरून माहिती दिली आहे.
बीजेपी के गुंडे CM @ArvindKejriwal जी के घर पर तोड़फोड़ करते रहे. बीजेपी की पुलिस उन्हें रोकने की जगह उन्हें घर के दरवाज़े तक लेकर आई. https://t.co/oSFc2kWaDC
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022
काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडलेफोड केली, असे ट्वीट करत सिसोदिया यांनी माहिती दिली आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये आपच्या विजयाने भाजप स्तब्ध झाले आहे.असे ट्वीट आपच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सहकार्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे. याशिवाय भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करुन तोडफोड केल्याचा आरोपही आपने केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर या हल्ल्याचा आरोप लावला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काश्मिरी पंडिंताबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते करत होते. या निदर्शनात तेजस्वी सूर्या, चहल, वैभव सिंग यांच्यासह दिल्ली प्रदेश युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.