Rahul gandhi | Narendra modi – यवतमाळ येथील महिल बचत गटाच्या मेळावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपसह शिंदे गटाच्या शिवसेनेनेही जोरदार तयारी केली आहे. मात्र, या तयारीपेक्षा सभेतील खुर्च्यांचीच राज्यभर चर्चा रंगली आहे. कारण या सभेतील खुर्च्यांवर चक्क राहुल गांधी यांचे फोटो होते. Rahul gandhi | Narendra modi
मोदींच्या या सभेसाठी यवतमाळमध्ये तब्बल ९ लाख चौरस फुटांवर मंडप उभारण्यात आला आहे. त्यासाठी येथे लाखो खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. यातील बऱ्याच खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो आहेत. ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या खुर्च्यांवरचे स्टिकर्स काढण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींची नागपुरात सभा झाली. त्यावेळी वापरण्यात आलेल्या खुर्च्याच कंत्राटदाराने यवतमाळमध्ये होत असलेल्या सभेसाठी पाठवल्या होत्या.
या खुर्च्यांवर लावलेले राहुल गांधींचे फोटोंचे स्टिकरदेखील तसेच होते. त्यामुळे मोदींच्या सभेला असलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर आणि त्यावर स्कॅन टू डोनेट असे आवाहन आहे. या खुर्च्यांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक खासदार भावना गवळींनी लावलेल्या स्वागताच्या पोस्टरची मंगळवारी बरीच चर्चा झाली. त्यांच्या होर्डिंगवर केवळ पंतप्रधान मोदी आणि भावना गवळी यांचे फोटो होते. Rahul gandhi | Narendra modi
गवळींनी त्यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो टाळले होते. त्यामुळे गवळींच्या नाराजीची चर्चा झाली. सध्या विद्यमान खासदार असलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसल्याने गवळी नाराज असल्याचे समजते.