Rahul Gandhi Helicopter । आज तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी दाखल झालेत. यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची राज्यातील निलगिरीमध्ये आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.
अधिकाऱ्यांकडून हेलिकाप्टरची तपासणी Rahul Gandhi Helicopter ।
याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हेलिकॉप्टर उतरताच आयोगाचे अधिकारी पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर काही वेळाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बाहेर येतात. अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केल्याचेही व्हिडिओत दिसतंय.
#WATCH कांग्रेस नेता राहुल गांधी जिस हेलिकॉप्टर से तमिलनाडु के नीलगिरी पहुंचे, उसकी नीलगिरी में चुनाव आयोग के फ्लाइंग स्क्वाड के अधिकारियों द्वारा जांच की गई।
(वीडियो सोर्स: चुनाव आयोग फ्लाइंग स्क्वाड) pic.twitter.com/pxpkWRm3de
— ANI_HindiNews (@AHindinews) April 15, 2024
वास्तविक, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींना तामिळनाडूतून केरळला जावे लागले. चार दिवस ते येथे पार्टी करणार आहेत. दरम्यान, सध्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय नेते हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. त्यातच सतर्कता म्हणून अशा पद्धतीने हेलिकाप्टरची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, समोर आलेल्या एका सर्वेक्षणानुसार काँग्रेसला केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात केरळच्या केरळमध्ये भाजप सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. येथील सर्व 20 लोकसभेच्या जागा इंडिया आघाडी जिकंण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणातून समोर येत आहे. तर एनडीएला राज्यात एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्येही एनडीएला राज्यात एकही जागा मिळण्याची शक्यता नाही, तर इंडिया आघाडी सर्व 39 जागा जिंकू शकते.
काय आहे राहुल गांधींचे वेळापत्रक? Rahul Gandhi Helicopter ।
काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी कोझिकोड येथे पोहोचतील, जिथे ते निवडणूक रॅलीला संबोधित करतील आणि मंगळवारी (16 एप्रिल, 2024) वायनाडला भेट देतील. त्यानंतर ते गुरुवारी कन्नूर, पलक्कड आणि कोट्टायममध्ये प्रचार करतील. ते त्रिशूर, तिरुअनंतपुरम आणि अलप्पुझालाही भेट देतील.