नवी दिल्ली – अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच ते मुंबईमध्ये सतत एकत्र दिसत होते, लवकरच ते लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
अशातच हे दोघे आयपीएलचा सामना बघायला स्टेडियममध्ये गेले होते. आम आदमी पार्टीचे खासदार राघव आणि परिणीतीला एकत्र बघून क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियमच दणाणून सोडले.
परिणीतीच्या हातात दिसली अंगठी !
या दोघांचा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोवरून दोघांचा साखरपुडा झाला की काय, असा सवाल चाहते विचारत आहेत. या फोटोंमध्ये परिणीती राघव यांच्या अगदी जवळ- जवळ उभे असल्याचे दिसून येत आहेत.
तसेच राघव यांच्या खांद्यावर डोके ठेवून ती मॅच बघत आहे. या फोटोंमध्ये परिणीतीच्या हातामध्ये अंगठी दिसत आहे. त्यावरून या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा आयपीएल सामना बघण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहालीत पोहोचलेल्या राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत, पण व्हिडीओ मात्र खूपच मजेदार दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव स्टेडियममध्ये चाहत्यात उभे असल्याचे दिसत आहे. या वेळी परिणीती चोप्राला बघून चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा देत होते.