पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयाच्या बाहेर ढोल ताशा वाजवून फटाक्यांच्या आतिषबाजीत पेढे वाटत आंनदोत्सव साजरा केला. “देशाचा बुलंद आवाज…शरद पवार..शरद पवार” , “पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” , “देश का नेता कैसा हो पवार साहेब जैसा हो” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपक मानकर, दत्ताभाऊ सागरे, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, समीर शेख, गणेश नलावडे उपस्थित होते.