जयपूर- आज आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 48 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा रंगणार असून जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे खेळला जाणार आहे. या मोसमात शेवटच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा राजस्थानने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला होता.
या सामन्यात दोन्ही संघांची नजर विजयावर आणि 2 गुण मिळवण्यावर असेल.हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल,सध्या गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबले मध्ये प्रथम स्थानावर आहे तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आज कोण कोणावर भारी पडतंय हे बघणे महत्वाचे ठरेल.
अशी आहे टीम-
राजस्थान रॉयल्स-
जोश बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (कॅप्टन ,विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट
गुजरात टायटन्स-
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कॅप्टन), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद आणि मोहित शर्मा