नवी दिल्ली – जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या राफेल नदालने शनिवारी टेलर फ्रिट्स याचा पराभव करत एटीपी मैक्सिको ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याचे 2020 मधील हे पहिले विजेतेपद आहे.
RAFA RULES ACAPULCO AGAIN ?@RafaelNadal is the @AbiertoTelcel champion for a third time after defeating Fritz 6-3 6-2! #AMT2020 pic.twitter.com/n5TIgCz3Ik
— ATP Tour (@atptour) March 1, 2020
नदालने अमेरिकेच्या फ्रिट्सचा 6-3, 6-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा मैक्सिको ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
यापूर्वी त्याने 2013 आणि 2015 साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याचे हे कारकिर्दीतील 85 वे विजेतेपद ठरले. तसेच नदालचा या स्पर्धेतील हा 19 वा विजय आहे तर दोन वेळा त्याला पराभवाचा सामना करवा लागला आहे.