मुंबई : ईडी भाजपचं एटीएम मशीन असून जितेंद्र नवलानीच्या मार्फत इडी ईडी भ्रष्टाचाराचं रॅकेट चालवत असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. त्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल करून त्याचा तपासकरण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमधील संघष्र आणख तिीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जितेंद्र नवलानी मोठमोठे बिल्डर्स, व्यावसायिकांना धमकावून पैसे वसुलीचे काम करतो, त्याचे अनेक पुरावे आहेत. कॅश, चेक, डिजीटल पेमेंटही केले जाते, असे सनसनाटी आरोप राऊत यांनी केले.
15 फेब्रुवारी नंतर राऊतांनी आज दुसऱ्या पत्रकार परिषदेचे आयोजन केलें. किरीट सोमय्या यांच्या नावाशिवाय भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव त्यांनी घेतलं नसलं तरी लवकरच भाजपच्या भ्रष्टाचारी नेत्यांचे पितळ उघडे पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने दिवाण हाऊन्सिंग फायन्सासची 2017 मध्ये चौकशी सुरु केली.
त्यानंतर जितेंद्र नवलानी खात्यावर 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2022 नंतर वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. नंतर ईडीने भोसलेंची चौकशी केली. मग भोसलेंकडून नवलानीला पैसे ट्रान्सफर झाले. अर्थात ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये कुठे-कसे पैसे गेलेत, हे मी हळूहळू सांगेन. नवलानी हा व्यक्ती कोण आहे? किरीट सौमय्या आणि नवलानीचा काय संबंध आहे, असे सवाल राऊतांनी उपस्थित केले.
राऊतांच्या पत्रकार परिषदेतले 10 मोठे मुद्दे
ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून निवडणुकीत तिकीट
जितेंद्र नवलानी ईडीचं रॅकेट चालवतात
नवलानी यांनी 100 हून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसुल केली
ईडीकडून व्यावसायिक बिल्डरांना धमकाविण्याचं काम सुरु
ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्स तपास सुरु केला
बेनामी पैसा ईडी अधिकाऱ्यांच्या खात्यात
तपास सुरु झाल्यानंतर नवलानीच्या 7 कंपन्यांना कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
दिल्ली महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडे कोट्यवधींची संपत्ती
बेनामी संपत्ती असलेल्या भाजप नेत्यांची नावं पंतप्रधान मोदींना देणार
सोमय्या बापबेटे तुरुंगात जाणारच
नवलानी आणि सोमय्यांना काय संबंध आहे?