किव्ह – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर परदेशी विद्यार्थी देश सोडण्याच्या लगबगीत आहेत. मात्र, त्यांना युक्रेनची सुरक्षा दले आणि सीमेवरील अधिकाऱ्यांशी वंशभेदाचा सामना करावा लागत आहे.
मी आणखी एक परदेशी विद्यार्थी बसने सीमेकडे जात असताना आम्हाला बाजूला थांबण्यास सांगण्यात आले. ही बस केवळ युक्रेनच्या नागरिकांसाठी असल्याचे वाहकाने सांगितल्याचे एका आफ्रिकन विद्यार्थिनीने सांगितले. राशेल ओनीइग्बुले या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्या समोरून दहा बस गेल्या.
त्यानंतरच्या बसमध्ये मला जागा मिळेल असे वाटत होते. मात्र, त्यानंतर बस फेऱ्या संपल्या असून आम्हाला चालत जाण्यास सांगण्यात आले. शेहीनी सीमेवर पोहोचण्यासाठी मला 12 तास पायपीट करावी लागली.
माझे शरीर थंडीने कापत असून आम्ही किमान चार दिवस झोपलो नाही आहोत. आफ्रिकन नागरिकांऐवजी युक्रेनच्या नागरिकांना सर्व गोष्टीत प्राथमिकता मिळत आहे. असं का? हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. आम्हाला ते माहीत आहे, आम्ही घरी जाण्याची वाट पाहात आहोत, असे ओनीइग्बुले हिने सीएनएन या वृत्तसंस्थेला सांगितले.
तिच्या कागदपत्रांवर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास प्रवेशासाठी शिक्का मारण्यात आल्याचे तिने सांगितले.