बायका बांगड्या भरतील म्हणून दहीहंडी रद्द मनसेचा कदमांना टोला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर्वपरिस्थितीमुळे अनेक मंडळ तसेच रराजकारणी लोकांनी दहीहंड्या रद्द करून पुरग्रस्थाना मदत केली आहे. घाटकोपर मधील मोठीदहीहंडी असणारी राम कदम यांची दहीहंडी देखील रद्द करून पुरग्रस्तना मदत करणार असल्याचे कदम यांनी सांगितले होते. यावर माणसे कार्यकर्त्यानी त्यांना चांगलंच ट्रॉल केलं आहे. पुरग्रस्थांसाठी नाही तर बायका बांगड्या भरतील म्हणून दहीहंडी रद्द केल्याचा टोला कदम यांना लगावला आहे.


मागील वर्षी राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी चांगलीच गाजली होती. त्यावेळी “एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेल” असं विधान कदम यांनी केले होते.

त्यानंतर कदम याना सर्वांच्याच टीकेला सामोरे जावे लागले होते. आपला कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असे स्पष्टीकरणही त्यांनी नंतर दिले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here