आशियाई देशांना २०२२ अखेरपर्यंत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या १ अरब मात्रा पुरवण्यावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या चार देशांनी आशिया खंडाला २०२२ अखेरपर्यंत कोरोना लसीच्या एक बिलियन मात्रा पुरवण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. या चार देशांच्या क्वाड संघटनेच्या नेत्यांची काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिली बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचं भारतात उत्पादन करण्यात येणार आहे.
यासाठी अमेरिका तंत्रज्ञानासह जपानच्या साथीनं आर्थिक मदत करणार आहे तर, ऑस्ट्रेलिया वाहतुकीसाठी सहकार्य करणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांनी दिली. दक्षिण पूर्व आशियायी देशांच्या संघटनेकडं हे डोस देण्यात येणार आहेत. भारतातील बायोलॉजिकल लिमिटेड ही कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अतिरिक्त लसींचे उत्पादन करणार आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींला आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कालच मान्यता दिली आहे. क्वाड समूहाचे सदस्य देश सहमत झाले असल्याचं पहिल्या शिखर परिषदेनंतर जाहीर करण्यात आलं.
या मात्रा आसियान तसंच प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशांना पुरवणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी सांगितलं.