८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायिका किरण सावंत यांच्या प्रस्तुतीत “आम्ही चौघी…’ हा स्त्री जीवनाचा प्रवास उलगडणारा प्रबोधनपर कार्यक्रम सख्ख्या चार बहिणींनी फेसबुक वर सादर केला. यामध्ये स्वतः किरण सावंत व शितल देगावे यांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी व मराठी लोकप्रिय गीते सादर केली.
कवयित्री निलाक्षी महाडिक यांनी त्यांच्या स्त्रीजीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील कविता सादर केल्या. निवेदिका रंजना पवार यांनी स्त्री जीवनाचा प्रवास ओघवत्या व उत्तम भाषाशैलीमध्ये मांडला. हा प्रवास उलगडण्यासाठी निवडलेली लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी व त्यांचे अप्रतिम सादरीकरण, कवितांचे प्रभावी वाचन व समर्पक निवेदनातून उलगडत गेलेली स्त्री ची कहाणी यामुळे हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर झाला.
किरण सावंत यांची कन्या कुमारी ईश्वरी सावंत हिनेसुद्धा गाणी सादर केली. सर्व नाती, जबाबदाऱ्या सांभाळून आजची स्त्री स्वावलंबी होऊन सक्षम होत आहे,जीवनाचा आनंद घेत आहे..अशा स्त्रीचा सन्मान करण्यासाठी या सख्या चार बहिणींनी ‘ आम्ही चौघी..’या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमासाठी या चौघीचे वडील अॅडवोकेट पी.टी जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.