पुणे – येथील प्रा. विलास रामराव जोशी यांनी इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली आहे.
त्यांनी ओपीजेएस विश्वविद्यालय-चुरू, राजस्थान येथे “हॅन्डलिंग प्रॉब्लेम्स इन फाइव्ह जी नेटवर्क’ या विषयावर संशोधन आणि प्रबंध सादर केला.
प्रा. जोशी हे सध्या पुण्यातील झील इंजिनिअरिंग कॉलेज येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेसह मित्र परिवारासह सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.