मुंबई : भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रीमियम सिनेमा प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्सने (PVR INOX) मुंबईतील नवीन प्रतिष्ठित लँडमार्क डेस्टिनेशन असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील जिओ वर्ल्ड प्लाझा (jio World Plaza) येथे एक अनोखी लक्झरी बुटीक मालमत्ता म्हणजेच सहा स्क्रीनचे लक्झरी चित्रपटगृह सुरू केले आहे. नव्याने लाँच झालेले हे मुंबईतील दुसरे लॅविश सिनेमागृह आहे. (PVR Inox’s luxury movie theater)
या नवीन चितंत्रपटगृहात ७९० प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेल्या ६-स्क्रिन्स आहेत, ज्यामध्ये २ स्क्रीनसह ट्रेडमार्क इन्सिग्निया क्षेत्र आणि लेझर तंत्रज्ञानासह १ मॅक्स स्क्रीन आणि ३ प्रीमियर स्क्रीनसह गॅलेरिचे क्षेत्र आहे. विशेष म्हणजे खास बार आणि स्पेशल लाउंज असलेले मुंबईतील हे पहिले सिनेमागृह आहे. चार सेलिब्रिटी शेफ, सारा टॉड, विकी रत्नानी, युताका सायटो आणि मयंक तिवारी यांनी खास क्युरेट केलेला एफअँडबी मेनू असलेले हे भारतातील पहिले चित्रपटगृह आहे. याव्यतिरिक्त या ठिकाणी गॅलेरिमध्ये डेझर्ट काउंटर, लाइव्ह कुकिंग काउंटर (Cooking caunter) आणि लेझर ऑडिटोरियमसह आयमॅक्स देखील आहे.(PVR Inox’s luxury theater)
इतर चित्रपटगृहांपेक्षा हे चित्रपटगृह अतिशय वेगळे आणि लक्जरी आहे. सिनेमा व्यतिरिक्त येथील इंटेरियर आणि सुविधा देखील खूप अद्ययावत आहेत. आयमॅक्स लाउंज उत्कृष्ट आणि उच्च तंत्रज्ञान प्रकाश वैशिष्ट्य आणि समर्पित फूड काउंटरसह डिझाइन केलेले आहे. (Mumbai luxury theater)
या चित्रपटगृहाच्या लॉन्च घोषणेवर बोलताना, पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली म्हणाले, चित्रपट प्रदर्शन उद्योगात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि भारतातील मनोरंजन प्रदर्शन क्षेत्राचे मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करते. भारतीय चित्रपट उद्योगाच्या केंद्रस्थानी असलेल्या चित्रपट रसिकांसाठी एक प्रतिष्ठित मनोरंजन स्थळ उघड करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि वैभवशाली सुविधांसह उपलब्ध असलेले हे चित्रपटगृह मुंबईतील चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक पसंतीचा पर्याय बनेल याची आम्हाला खात्री आहे असंही बिजली यावेळी म्हणाले.