Pure For Sure service: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने ग्राहकांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. ज्याचा ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. ‘प्युअर फॉर शुअर’ असे या योजनेचे नाव असणार आहे. बीपीसीएल कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलिंडरची गुणवत्ता आणि त्याच्या प्रमाणाची हमी देण्यासाठी ही नवी सुविधा आणली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच सेवा दिली जाणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना क्यूआर कोडसह सिलिंडरची डिलिव्हरी दिली जाईल
बीपीसीएलचे एलपीजी सिलिंडर ज्यावेळी ग्राहकाच्या घरी पोहोचते केल जाईल त्यावेळी ते सील प्रूफ असेलच. याशिवाय त्यावर आता क्यूआर कोड देखील असणार आहे. याद्वारे ग्राहकांना वेळेत, योग्य वजनाचे सिलेंडर मिळणार आहे. सिलेंडरशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. डिलिव्हरी घेण्यापूर्वी ग्राहक सिलेंडर तपासू शकतील. या सीलवर एक QR कोड असेल. उत्पादन केंद्रातून ग्राहकांना सिलिंडर सुरक्षितपणे वितरित केले जातील याची हमी ग्राहकांना दिली जाईल.
कोणत्या सुविधा असणार?
गेली काही महिन्यांपासून सिलेंडरमधील काळाबाजाराचे करण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत कंपनीकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे चग्राहक आणि कमर्चारी यांच्यात वाद निर्माण होत होता. त्यावर उपाय म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे. ओटीपी, डिलिव्हरी आणि पसंतीचे स्लॉट बुकिंग यांसारख्या फिचरसह प्युअर फॉर शुअर उत्तम सेवेचा अनुभव देणार आहे.
कसा होणार फायदा?
ग्राहक QR कोड स्कॅन करताच, सिग्नेचर ट्यूनसह ‘प्युअर फॉर शुअर’ लिहिलेला पॉप अप दिसेल. ज्यामध्ये सिलेंडरशी संबंधित सर्व माहिती असेल. सिलिंडर भरताना त्याचे वजन किती होते, त्यावर शिक्का किंवा खूण आहे की नाही, यासह डिलिव्हरी स्वीकारायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकांना असेल. एलपीजी सिलिंडरच्या सीलशी कोणी छेडछाड केल्यास, क्यूआर कोड स्कॅन केला जाणार नाही. त्यामुळे डिलिव्हरी थांबू शकते.