घामाच्या पैशाने तिकिट खरेदी करतो…- करण जोहरला नेटकऱ्याऱ्यांनी सुनावले

मुंबई – अभिनेता टायगर श्रॉफ आणि आलिया भट यांचं ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले होते.  ‘हुकअप’ असं या गाण्याचं नाव असून, युट्यूबवर हे गाणं जोरदार व्हायरल झाले होते. ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ या सिनेमातलं हे तिसरं गाणं असून, या गाण्यामध्ये आलिया आणि टायगरची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मात्र, प्रेक्षकांच्या मते ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ हा चित्रपट हिट नाही तर फ्लोप आहे. दिग्दर्शक करण जोहरने हा चित्रपट समरटाईम हिट असल्याचा दावा केल्यानंतर लोकांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.

आम्ही घामाच्या पैशाने तिकिट खरेदी करतो. आमचा पैसा लॉंचिंग आणि बीच कॉस्च्युम दाखवण्यावर व्यर्थ घालू नकोस. आम्ही मुर्ख नाही, असे एका युझरने करणला सुनावले आहे. धर्मा प्रोडक्शनचा ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटाचं बजेट 80 कोटींचं होतं. पण चित्रपटाने कसाबसा 57.90 कोटींची बिझनेस केला आहे. मात्र करण जोहरने या गोष्टी लक्षात न घेता ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ चित्रपट समरटाईम हिट झाल्याची घोषणा केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.