पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा:नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी आणि हिरेव्यापारी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीची न्यायालयीन कोठडी ऑक्‍टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायदंडाधिकारी न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते.

नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून भारतातून फरार आहे. त्याला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वॉंड्‌सवर्थ तुरूंगात आहे. तेथील कायद्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यानंतर ताब्यातील कालावधी वाढवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले जात आहे. या अगोदर मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी असे संकेत दिले होते की, दोन्ही पक्ष त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्तावित पाच दिवसांच्या सुनावणीवर लवकरच तयार होऊ शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.