वाई विधानसभा मतदार संघात…कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी

माजी आमदार मदन भोसले यांच्या प्रयत्नांना यश
123 कोटींच्या कामांना तत्वत: मान्यता

वाई – सध्या विधानसभेची चाहूल लागल्याने निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने विकास कामांच्या मंजुऱ्यांचा धडाका लावला असून त्याचा फायदा वाई विधानसभा मतदार संघाला झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. माजी आमदार व भाजपचे नेते मदन भोसले यांच्या प्रयत्नातून वाई विधानसभा मतदार संघात 123 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून विकास कामना तत्वता मान्यता मिळाल्या आहेत. यामध्ये वाई तालुक्‍यासाठी 64 कोटी, खंडाळा तालुक्‍यासाठी 23 कोटी महाबळेश्‍वर तालुक्‍यासाठी 35 कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे.

वाई शहरासाठी भुयारी गटर योजना व सांडपाणी प्रकल्प यासाठी मुख्यमंत्री याच्याकडे 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असता त्यानी या कामाला प्राधान्य देत तत्परतेने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता दोन नवीन पुलाचे प्रस्ताव ही सादर केले होते.
यापैकी सिद्धेश्‍वर (सिध्दनाथ वाडी) येथील पुलासाठी 3 कोटी 84 लाख रुपये तर किवरे ओढा पुलासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.
नगरपालिका शाळानंबर चार नूतनीकरणासाठी 3 कोटी, सोनगीरवाडी व सिध्दनाथवाडी येथील शॉपिंग सेंटर व भाजी मंडई यासाठी पाच कोटी रुपये आणि रविवार पेठ येथे ऍडव्हेंचरपार्कसाठी तीन कोटी 50 लाख रुपये, तसेच मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी संरक्षकभींत व अंतरंग सुशोभीकरण यासाठी 70 लाख रुपये व मूलभूत नागरी सुविधा अंतर्गत रविवारी पेठ येथील पीर दफनभूमीच्या पायऱ्यासाठी 9 लाख रुपये, ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या प्राज्ञपाठशाळा नवीन इमारत उभारणीसाठी पाच कोटींचा निधीला मान्यता असा ऐकून 64 कोटी रुपयांचे प्रस्ताव दिले असून त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिली
आहे.
महाबळेश्‍वरसाठी 35 कोटींचा निधी मंजूर झाला असून यामध्ये लॅंडविक रस्ता 7 कोटी, क्षेत्र महाबळेश्‍वर ते नाकिंदा रस्ता 13 कोटी, महाबळेश्‍वर ते क्षेत्रमहाबळेश्‍वर रस्ता 15 कोटींचा निधीला मंजुरी मिळाली आहे.
खंडाळा तालुक्‍यात लोणंद नगरपंचायतीसाठी 13 कोटींचा निधी मिळाला असून यामध्ये शहरातील बंदिस्त गटार, पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी, पूल बांधणी, अंतर्गत रस्ते, प्रशासकीय इमारत, व्यापारी संकुल, बाजार पेठ, सामाजिक भवन यांचा समावेश आहे, खंडाळा नगरपंचायतीसाठी 10 कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये नवीन प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा टाकी, जलशुध्दीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे. अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी म्हटले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)