पंजाब सरकारचा दोन आठवडे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय  

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी पंजाब सरकारने लॉकडाऊन दोन हप्ते वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान  ४ तासासाठी शिथिलता देण्याचा निर्णय देखील घेण्ययात आला. या चार तासात नागरिकांना फक्त आत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदरसिंघ त्यांनी सांगितले कि, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावामुळे पंजाबमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. आज राज्यात लॉकडाऊनचा ३८ वा दिवस आहे. १ दोन दिवस लॉकडाऊन  ठीक आहे परंतु ३८ दिवस लॉकडाऊन असणे गंभीर बाब आहे.  राहात राहणाऱ्या नागरिकांनी प्रत्येकासाठी लॉकडाऊनमध्ये योगदान दिले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, नागरिकांसाठी रोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये ढील देण्यात येईल. तेव्हाच नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडावे असं आवाहन त्यांनी केलं. रोज ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु राहतील असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, ११ वाजेनंतर लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्या वेळी कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडून नये असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, पंजाबमध्ये कोरोनाचे ३२२ रुग्ण आहेत, तर १९ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच ७१ जण कोरोनमुक्त झाले असुन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

देशात ३१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाधित रुग्ण
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ३१ हजार ३३२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.