पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : देशात एकीकडे केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागच्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांमध्ये पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यातच आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे माहिती समोर आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिंह यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकी कोणी दिली? हे अजुन स्पष्ट झाले नसून, पोलीसांनी अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एका पोस्टरमध्ये कॅप्टन यांना मारण्यासाठी 10 लाख डॉलरची घोषणा करण्यात आली आहे.

मोहालीतील सेक्टर-11 परिसरातील पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलीस सायबर गुन्हे शाखेची मदत घेत आहे. मोहालीच्या सेक्टर-66/67 पब्लिक गाइड मॅप्स असून, यावर अमरिंदर सिंह यांचा फोटो लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यापोस्टरवर एक ईमेल अॅड्रेस असून, पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.