केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव; मोफत लस फक्त कोरोना योद्ध्यांनाच

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर अजून ही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा हाच संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केंद्र आणि राज्यसरकार कडून केले जात आहेत. आज (दि. २) पासून कोरोना लसीचे ड्राय रन केले जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे.  

तर एक एकीकडे कोरोना लस किती रुपयांना मिळणार याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले कि, “संपूर्ण देशभरात कोरोनाची लस ही मोफत दिली जाणार आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मात्र, आता आरोग्यमंत्र्यांनी आपले शब्द माघार घेतले असून, “सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. देशभरात लस मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केला. 

ते म्हणाले कि,  “लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या टप्प्यात काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.