मुंबई – शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजप आमदार अतूल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला होता.
बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे वैचारिक ‘सुंता’, उर्दू कॅलेंडरवरुन भाजपचा शिवसेनेवर हल्ला
हिंदूहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले
“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान हिंदूहृदयसम्राट असंच आहे. ते आजही हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जातात. कोणताही राजकीय प्रक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी होत नाही.”