बंगळुरू – कन्नड चित्रपट अभिनेता ‘पुनीत राजकुमार’चे वयाच्या 46व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेत्याच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कर्नाटमध्ये पुनीतचे मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांना पुनीतच्या मृत्यूचा एवढा धक्का आहे. की, तीन चाहत्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. तर सात जणांनी आत्महत्या केलीय. आता पर्यंत 10 जणांनी आपला जीव गमावला आहे.
तर आत्महत्या केलेल्यांपैकी तीन जणांनी नेत्रदान करता यावं म्हणून जीव दिल्याची माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे. 3 नोव्हेंबर रोजी टुमकुरमध्ये राहणाऱ्या भरतने फाशी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी भरतने एक चिठ्ठी लिहून ठेवून होती.
आपल्या चिठ्ठीत भरतने लिहलं होत की, “मला अप्पूच्या मरणाचं दु:ख सहन होत नाहीय. मी त्यांच्यासोबत राहण्यासाठी आत्महत्या करत आहे. त्यांच्याप्रमाणेच माझे डोळेही मृत्यनंतर दान करण्यात यावेत..’ असं त्यानं म्हंटल.
पुनीत राजकुमारला शुक्रवारी, 29 ऑक्टोबर 2021 दुपारी एक ते दीडच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि रुग्णालयातच पुनीत आयांनी अखेरचा श्वास घेतला.