अहमदनगर – अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला आज सकाळी आग लागल्याची बामती समोर आली आहे. या आगीत आयसीयू मधीळ सर्व रुग्ण भाजले आहेत. त्यापैकी सात जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगाची माहिती मिळताच रुग्णालयात अहमदनगर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान व गाड्या दाखल झाल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला लागलेल्या या आगीत आयसीयू जळून खाक झाले आहे. येथील रुग्णांना तात्काळ इतर वार्डात सुरक्षित हलविण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.