U Mumba vs Telugu Titans, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात यु मुम्बा व तेलगु टायटन्स या संघांनी अफलातून खेळ केला. सामन्याचे पारडे क्षणाक्षणाला बदलत होते. अखेर हा सामाना 45-45 असा बरोबरीत सुटला. साखळी टप्प्यातील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना होता.
WHAT. A. MATCH. 🤯
The Mumboys and Titans share the points in their final #PKLSeason10 match 👏#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL10 #HarSaansMeinKabaddi #MUMvTT #UMumba #TeluguTitans pic.twitter.com/pHkovL9xGu
— ProKabaddi (@ProKabaddi) February 20, 2024
पहिले सत्र सुरु झाले तेव्हापासून तेलगु संघाने अफलातून बचावाचे दर्शन घडवले. त्यांनी सर्वोत्तम चढाया करताना गुणांतही बाजी मारली. अर्थात याच सत्रात त्यांचे हे वर्चस्व यु मुम्बाने काहीअंशी मोडूनही काढले. तेलगु संघाचा स्टार खेळाडू पवन शेरावत व यु मुम्बाचा रेडर गुमान सिंग यांच्यातील लढत नेत्रदीपक ठरली. पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटांत यु मुम्बाने तेलगु संघाला कडवी लढत दिली. त्यामुळे या सत्रात दोन्ही संघांची 19-19 अशी बरोबरी झाली.
दुसरे सत्र सुरु झाल्यावरही या दोन संघातील चुरस कमी झाली नव्हती. एकवेळ तर यु मुम्बाने सामन्यात आघाडीही घेतली होती. दोन्ही संघांतील चुरस पाहण्यासारखीच होती. हीच आघाडी त्यांनी कायम राखली.
#PKLSeason10 ( #GGvJPP Match 128 ) : जयपुर पिंक पॅंथर्सचा विजयी धडाका कायम…
अमिरमहंमद जफरदनेशने यु मुम्बाला वर्चस्व मिळवून देताना तब्बल 11 गुण मिळवत दुसरे सत्र गाजवले. त्याचाच खेळ या सामन्याला कलाटणी देणारा ठरणार होता मात्र, तेलगु संघाच्या रुबीन चौधरीने मोक्याच्या क्षणी गुण मिळवले व यु मुम्बाचे प्रयत्न वाया गेले आणि हा सामना 45-45 असा बरोबरीत सुटला.