सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा 5 मेपर्यंत तहकूब

सातारा – आयुर्वेदिक गार्डनच्या विकासासह 20 विषयांसाठी आयोजित करण्यात आलेली सातारा पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा 5 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या विषयाचे सूचक सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील व अनुमोदक स्मिता घोडके होत्या. ही सभा गुरुवारी सकाळी 11 वाजता सुरू झाली.

सभेस पाच मिनिटे होतात, तोच सभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली. याबाबतची सूचना निशांत पाटील यांनी मांडली. करोनाचे वाढते संक्रमण आणि सभागृहात फक्‍त 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, या पार्श्‍वभूमीवर ही सभा तहकूब करावी.

करोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर सभा घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सभा 5 मेपर्यंत तहकूब करायचा निर्णय नगराध्यक्ष माधवी कदम यांनी घोषित केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.