पुणे – इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असतानाच महाविकास आघाडी सरकारकडून सीएनजी वाहनधारकांना दिलासा देत सीएनजी वरील 10 टक्के व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे 1 एप्रील पासून पुण्यात सीएनजी साडे सहा रूपयांनी स्वस्त झाला आहे.
या निर्णयाचे स्वागत करत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने वाहनचालकांना पेढे वाटप करण्यात आले. तसेच हा निर्णय घेणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले.
युवती अध्यक्ष सुषमा सातपुते कॅन्टोमेंट अध्यक्ष आनंद सावणे कॅन्टोमेंट कार्यध्यक्ष राहुल तांबे, मंगेश मोरे, शालिनी जगताप, कॅन्टोमेंट युवती अध्यक्ष नीलम कांबळे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, प्रेमा पटुळे, नसरीन शेख, अपर्णा पाटसकर, मृणाल ओव्हाळ, हार्दिका ओहळ, ज्योती जाधव, व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.