पुणे – पुणे बांधकाम विश्वात विश्वास आणि गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या व एरंडवणेची स्काय लाइन बदलणारा आयकॉनिक गृहप्रकल्प वेंकटेश एरंडवणे सेंट्रल या भव्य प्रकल्पातील दुसरा टप्पा आज सादर करण्यात आला. या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वेंकटेश बिल्डकॉनचा एरंडवणे सेंट्रल प्रकल्पातील दुसरा टप्पा शनिवार (१६ डिसेंबर २०२३) सादर करण्यात आला. यावेळी माजी आमदार कुमार गोसावी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विद्याधर अनास्कर, संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वेंकटेश बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक अंकुश आसबे, संचालक लहुराज आसबे, संचालिका पियुषा आसबे, संचालक अमित मोडगी यांनी सर्वांचे स्वागत केले.
एरंडवणे हा शहरातील प्रतिष्ठेचा एक भाग. या ठिकाणी वर्षभरापूर्वी सादर झालेल्या वेंकटेश एरंडवणे सेंट्रल या भव्य प्रकल्पातील गृह व व्यावसायिक प्रकल्पास मोठा लक्षणीय प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील बी ३ व ए १ या क्रमांकाच्या इमारतींचे लाँचिंग आज करण्यात आले. यात ए १ इमारतीमध्ये तीन बीएचके व बी ३ या इमारतीमध्ये तीन व चार बीएचकेचे प्रशस्त व अति आरामदायी सुमारे दोनशे सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
विविध कारणांनी मुख्य पुणे शहरातील नागरिक आपली जीवनशैली अपग्रेड करताना दिसत आहेत. परदेशातील माहिती तंत्रज्ञान व इतर उद्योगांमधील कामाचा अनुभव भारतीय जीवनशैलीतील गरजांचा सुंदर मिलाफ करून ग्राहकांच्या गरजानुरूप अति आरामदायी रचना या दुसऱ्या टप्प्यातील सदनिकांमध्ये विचारपूर्वक करण्यात आली आहे. आपली जीवनशैली अपग्रेड करण्याच्या शोधात असणार्या चोखंदळ पुणेकरांसाठी हा प्रकल्प एक उत्तम पर्याय ठरणार आहे. या वेळी बोलताना श्री. आसबे यांनी सांगितले.
वेंकटेश एरंडवणे सेंट्रल हा प्रकल्प साडे चार एकरावर उभारण्यात येत असून ३ व ४ बीएचके सदनिकांचा समावेश असणार्या ३० मजल्यांच्या पाच आयकॉनिक इमारतींमध्ये या प्रकल्पात सहाशेहून अधिक सदनिका असणार आहेत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पुरेशी जागा, आऊटडोअर व इनडोअर जीम, जॉगिंग ट्रॅक, वॉक वे, बिझनेस लाऊंज, पार्टी लॉन, सिनिअर सिटिझन सिट आऊट, कॅफेटेरिया लायब्ररी, वातानुकूलित मास्टर बेडरूम, मल्टिपर्पज रूम, ओपन एअर जीम, फिटनेस सेंटर ट्राय सिकल पार्क, ई व्ही चार्जिंग पॉईंट, बोर्ड गेम्स, ड्रायव्हर रूम या व अशा अत्याधुनिक २५ हून अधिक सुविधा या प्रकल्पात असणार आहेत.
दरम्यान प्रकल्पाच्या ठिकाणी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती व्हावी या उद्देशाने बांधकाम साहित्य, तांत्रिक गोष्टींची माहिती व सदनिकेतील सर्व गोष्टींचा अनुभव देणारे कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर उभारण्यात आले आहे. ज्यात प्रकल्पात दिल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता ग्राहकांना पाहता येणार आहे.