Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 8 राज्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील सात जागांवर मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. दिल्लीतील सातही जागांवर भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये थेट लढत आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष युतीच्या अंतर्गत निवडणुकीच्या रणधुमाळीत आहेत. भाजपच्या विरोधात आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्त उमेदवार उभे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘आप’ चार जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेस लढत आहे.
#WATCH | Delhi: Union Minister Hardeep Singh Puri says, “Come out in large numbers and vote. Political consciousness is very high in India. Shed your apathy…The issues are very clear, the issues are about development. But the issues that the opposition is framing, they try to… pic.twitter.com/rQkMDc06Wm
— ANI (@ANI) May 25, 2024
सध्या मतदानाला सुरुवात झाली असून नुकतेच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, त्यांची पत्नी लक्ष्मी पुरी यांनी दिल्लीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून लोकशाहीचा हक्क बजाववा असं आवाहन त्यांनी केलं आहे. “मोठ्या संख्येने मतदान करा. मुद्दे अगदी स्पष्ट आहेत, मुद्दे विकासाचे आहेत. पण विरोधक जे मुद्दे बनवत आहे, ते सेल्फ गोल करण्याच्या प्रक्रियेत खोटी कथा तयार करण्याचा प्रयत्न करतात. ते हरले आहेत, आम्ही दिल्लीत हॅट्ट्रिक करू,” असा विश्वासही यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला.
दरम्यानम, सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील सर्व १० जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेशातील १४, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, ओडिशातील ६, झारखंडमधील ४ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. जम्मू-काश्मीरमधील १ जागा त्या प्रक्रियेला सामोरी जाईल. सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, कॉंग्रेसचे तरूण नेते कन्हैया कुमार आदींचा समावेश आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा:
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले, दिल्लीत करणार मतदान