पुणे – बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आणि हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 19 जूनपर्यंत आहे.
बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानंतर बारावीनंतरच्या डिप्लोमा प्रवेशप्रक्रियेची वेळापत्रक “डीटीई महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार डिप्लोमासाठी अर्ज करण्याची सुरुवात 3 जूनपासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी 20 जून रोजी जाहीर होणार आहे.