एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना “ईदी’

रमजान ईदनिमित्त झाले पगार ः 71 वर्षांत पहिल्यांदाच निर्णय
पिंपरी –
राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी) “ईदी’ म्हणजेच ईदची भेट देण्यात आली आहे. मुस्लिम कर्मचारी बांधवांना रमजान ईद उत्साहात साजरी करता यावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन मंगळवारी रोजीच करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या 71 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ईद निमित्त पगार लवकर करण्यात आले. मुस्लिम कर्मचारी बांधवांना ईद उल फितर (रमजान ईद) उत्साहात साजरी करता यावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचे पगार लवकर करावे, असे आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. एस.टी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा 7 तारखेला होते. पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने मंगळवारीच (दि.4) करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार एसटी महामंडळाच्या प्रशासनाने मुस्लिम कर्मचाऱ्यांचे पगार करून नविन इतिहास घडविला. एसटी महामंडळात सुमारे 1 लाख कर्मचारी आहेत. या सर्वांच्याच पगारी आज मंगळवार दि. 4 रोजीच करण्यात आल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.