पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी कोवॅक्सिन आणि कोवॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, दोन्ही मिळून 64 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. याशिवाय सोमवारी प्रत्येक केंद्रांवर कोविशील्डची 200 जणांना लस मिळेल. तर कोवॅक्सीनचा डोस दिल्या जाणाऱ्या एकूण सात केंद्रांपैकी सहा केंद्रांवर प्रत्येकी एक हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोविशील्ड लस ही 57 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.