पुणे- विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीचा विचार करून “पेरा’ या खासगी विद्यापीठाच्या संस्थेकडून दुसऱ्यांदा दि.27, 28 आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी दि.23 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.
“प्रिमीयंट एज्युकेशन अँड रीसर्च असोसिएशन’ (पेरा) या संस्थेमार्फत जुलैमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मागणी होत असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षी एमएचटी-सीईटी परीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी “पेरा’ने पुन्हा ऑनलाइन सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. याद्वारे विद्यार्थी राज्यातील 14 खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करू शकतात.