पुणे- आता व्हॉट्स ऍपवर काही सेकंदातच करोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळण्याची सोय केंद्र सरकारच्या आयटी सेलने केली आहे.
करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ज्या नंबरवरून आपण लसीसाठीचे रजिस्ट्रेशन केले आहे, तेथे “माय गव्हर्नमेंट करोना हेल्पडेस्क’ नावाने 9013151515 या नंबर सेव्ह करणे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केलेल्या नंबरवरून दिलेल्या नंबरवर “Covid Certificate” असे टाइप करून व्हॉट्सऍप मेसेज करायचा.
त्यानंतर ज्या नंबरवरून आपण मेसेज केला आहे, त्याच नंबर वर “ओटीपी’ नंबर मेसेज बॉक्समध्ये येईल. हा ओटीपी नंबर व्हॉट्सऍपच्या “माय गव्हर्नमेंट करोना हेल्पडेस्क’ मध्ये 30 सेकंदाच्या आत टाकल्यास आपल्याला लस घेतल्याचे प्रमाणपत्र काही सेकंदातच मिळते.
एकाच नंबरवरून चार रजिस्ट्रेशन करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे रजिस्ट्रेशन केलेल्या नंबरवर ओटीपी टाकल्यानंतर जेवढ्यांचे रजिस्ट्रेशन केले, त्या सर्वांपैकी कोणा कोणाचे प्रमाणपत्र हवे आहे याची नंबर देऊन विचारणा होते. त्यानंतर ज्याचे हवे आहे त्याचा क्रमांक टाकल्यास लगेचच काही सेकंदातच प्रमाणपत्राची पीडीएफ मिळते. याशिवाय अन्य सदस्यांचे प्रमाणपत्र हवे आहे का अशी विचारणाही केली जाते. अन्य सदस्यांचे प्रमाणपत्र हवे असेल तर “वाय’ आणि नको असेल तर “एन’ टाइप करा अशा सूचनाही येतात.
- असे मिळवा प्रमाणपत्र
- सेव्ह नंबर – 9013151515
- Type- Covid Certificate
- मेसेज बॉक्समध्ये आलेला सहा अंकी ओटीपी व्हॉट्सऍप मध्ये 30 सेकंदाच्या आत टाकणे
- एकापेक्षा जास्त जणांचे रजिस्ट्रेशन केले असेल तर सिलेक्ट केलेल्या मेंबरचा क्रमांक टाकणे
- प्रमाणपत्र डाऊनलोड करणे