1 लाख 16 हजार 784 दावे निकाली काढण्यात यश
पुणे – वर्षभरात घेण्यात आलेल्या चार लोकअदालतींमध्ये पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. या लोकअदालतींमध्ये 1 लाख 16 हजार 784 दावे निकाली काढण्यात यश आले.
मुंबई राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात लोकअदालतचे आयोजन करण्यात येते. पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा न्यायालयाचे तत्कालीन प्रमुख न्यायाधीश एस. बी. आगरवाल आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
याविषयी भागवत म्हणाले, नुकतेच 14 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींमध्ये 26 हजार 760 दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकअदालतीत सर्वांधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे.