पुणे : शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी जोर वाढला आहे. सारसबाग येथील शिवसेना भवन येथे काल हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या शेकडो तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे, महिला शहर प्रमुख लीना ताई पानसरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, वैद्यकीय शहर प्रमुख अजय सपकाळ, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, श्रद्धा शिंदे ,सामाजिक कार्यकर्ता अमर घुले, विभाग प्रमुख हडपसर अक्षय तारू यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.काहीच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी ही शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याने शहरात पक्षाचे संघटन आणि ताकद वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शहरात शिवसेनेचे पक्ष संघटन मोठ्या प्रमाणावर बळकट होत असून येत्या काही काळात शिवसेनेत विविध पक्षाचे मोठे पदाधिकारी सुद्धा प्रवेश करणार असल्याचे सुतवाच शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.