खडकवासला – आज (दि. २१) पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला हवेली पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यात २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कायद्याची जनजागृती करण्यात येणार आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे.
भोंदू बाबा कश्या प्रकारे नागरिकांची दिशाभूल करुन फसवतात हे प्रात्यक्षिके प्रशांत पोतदार यांनी सादर करून दाखवली. यावेळी पोलीस, पोलीस पाटील, पत्रकार यांना सहभागी करुन घेत भोंदू बाबा कशा पध्दतीन चलाखी करतात हे स्पष्ट केल.
नंदीनी जाधव यांनी या कायद्या विषयी व कौमार्य चाचणी, इतर अनिष्ट प्रथांबद्दल आळा कसा घालता येईल व कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन ही केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रमेश जगताप, भगवान रणदीवे ,रमेश जगताप यांनीही प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी आधिकारी अनमोल मित्तल, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, साहाय्यक फौजदार दिलीप आंबेकर ,साहाय्यक फौजदार सुभाष गीरे, पोलीस कर्मचारी राजेंद्र मुंढे, गणेश धनवे, संतोष भापकर, अशोक तारु, दिनेश कोळेकर, चंद्रकांत शिंदे, विलास प्रधान,निलेश राणे, महिला पोलीस कोलते,पोलीस पाटील रुषीकेश मते,गणेश सपकाळ, कालिदास माताळे ,नितीन शेडे, संदिप कांबळे ,अनंता पंडित, सुप्रिया जोरी,गौरी चव्हाण गृह रक्षक दलाचे जवान शांताराम राठोड ,अमित गोगावले ,मनोज निवंगुणे, केतन चोरघे, गोविंद रजपूत, प्रथमेश मालुसरे तसेच सार्वजनिक कार्यकर्ता दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते