पुणे | नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना कोंढवा भागात घडली. नवजात अर्भकाची जबाबदारी न स्विकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई सैफनमुलुक नदाफ यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढव्यातील नालंदा बौद्ध विहारामागे असलेल्या ओढ्यालगत नवजात अर्भक सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अर्भकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अर्भकाचा मृत्यू झाला होता. नवजात अर्भकाची पालकत्वाची जबाबदारी न स्विकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनैतिक संबंधातून नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मचाले तपास करत आहेत.