पुणे – दोन आठवड्यांत 130 कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत

पुणे – आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन आठवड्यांतच महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 130 कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. दि.1 ते 15 एप्रील या कालवधीत हा कर जमा झाला असून मागील वर्षी याच कालावधीत 113 कोटींचा महसूल जमा झाला होता. गत वर्षीच्या तुलनेत सुमारे 17 कोटींनी वाढ झाली असल्याचे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून नागरिकांच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत म्हणजेच 31 मेपर्यंत करभरणा केल्यास 25 हजार रूपयांपर्यंत 5 टक्के तर त्या पुढील रकमेवर 10 टक्के कर सवलत दिली जाते. त्यामुळे पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणत कर भरण्यास प्राधान्य दिले जाते. या वर्षी सुमारे 90 हजार 284 मिळकतधारकांनी सुमारे 82 कोटी 22 लाखांचा मिळकतकर ऑनलाइन स्वरूपात भरला आहे. तर 30 कोटी 55 लाख रुपये धनादेशाद्वारे भरण्यात आली असून 21 हजार मिळकतधारकांनी हे धनादेश दिले आहेत. तर 30 हजार 742 मिळकतधारकांनी 17 कोटी 59 लाख रूपयांचा मिळकतकर रोखीने जमा केला आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या 20 हजारांनी वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.