वाघोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व बारामती हाय टेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी वाघोलीत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेवून मनमोकळेपणाने संवाद साधला.
जयेश विलास कंद सोशल फाउंडेशन च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांशी संवाद होत आहे. त्यांच्याशी चर्चेतून काही प्रश्नही समोर येत आहेत.
महिला मनमोकळेपणाने चर्चा करीत असल्याचा आनंद आहे. यामुळे मी आर्वजून कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. पवार यांनी मनमोकळेपणे संवाद साधल्याने महिला कार्यकर्त्या खुश झाल्या. याप्रसंगी वैशाली नागवडे, लोचन शिवले, मोनिका हरगुडे, अर्चना कटके, हेमलता बडेकर,चारुशीला कांचन, उत्कर्षा गोते,ज्योती थोरात,गीता गाढवे, माधुरी वाळके, नम्रता कांबळे, शोभा हरगुडे, पूजा कंद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
“महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जडणघडणीमध्ये अजित दादा पवार यांच्या कुटुंबाचे योगदान उल्लेखनीय असून महिलांना संघटित करून आत्मनिर्भर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.”
जयेश विलास कंद,
अध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आघाडी.