बारामती विधानसभा मतदारसंघात जनतेशी साधला संवाद
बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि. 4) महायुतीच्या उमेदवार यांनी भर दुपारी रखरखत्या उन्हात प्रचार करीत मतदारांना साद घातली. शनिवारच्या प्रचार दौर्याचा प्रारंभ सुनेत्रा पवार यांनी सावंतवाडी गावापासून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची माहिती देऊन केली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
यावेळी महयुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दुपारच्या वेळी सोनवडी गावात चक्क एका भल्यामोठ्या वटवृक्षाच्या छायेत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित गावकर्यांना मार्गदर्शन केले. येणा-या काळात आपला हा भाग केद्रसरकरच्या माध्यमातून पाणी टंचाईमुक्त करण्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला. दरम्यान, तळपत्या उन्हात जशी, या झाडाची सावली लाभली, तशीच तमाम जनतेची साथ,घड्याळापाठी एकवटली, असे सुनेत्रा पवार यांनी म्हणत मतदारांचे आभार मानले.
भोरकरवासीयांकडून जोरदार स्वागत
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे भोर शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करून पाठिंबा दर्शविला. गेली 15 वर्षे आपण इतरांना संधी दिली. एकदा मला संधी देऊन बघा मी आपल्या अडचणी सोडवण्याचा विश्वास देते, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.