बॉम्बनाशक विरोधी पथक, ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर
पुणे – कोरेगाव भीमा ऐतिहासीक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सोमवारी (दि.१) होणारी गर्दी विचारात घेता तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी चार अप्पर पोलीस आयुक्त, अकरा पोलीस उपायुक्त, ४२ सहायक आयुक्त, ८६ पोलीस निरीक्षकांसह तीन हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्या, बॉम्बनाशक विरोधी पथक असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रभारी सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते.
कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक तारखेला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात. या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पुर्ण झाली असून परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. वाहनांना पार्विंâग, वाहतूक बदल आदींचे नियोनज करण्यात आले आहे.
* असा आहे बंदोबस्त
अप्पर पोलीस आयुक्त – ४
पोलीस उपायुक्त – ११
सहायक आयुक्त – ४२
पोलीस निरीक्षक – ८६
सहायक – उपनिरीक्षक – २७१
पोलीस अंमलदार – ३,२००
एसआरपीएफ – ६ कंपन्या
बीडीडीएस – ९ पथके
क्यूआरटी – ३ पथके
कोरेगाव भिमा परिसरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त राहणार आहे. ड्रोन तसेच सीसीटीव्हींची यंत्रणा कार्यरत राहणार असून नागरिकांसाठी पार्विंâगची व्यवस्था करण्यात आली आहे.
– रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर