पुणे (प्रतिनिधी) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्यविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र नोंदणी उपक्रम राबविण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 सोमवार पेठ, रास्ता पेठ मधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते आरोग्य तपासणी, तसेच ओळखपत्र नोंदणी शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी स्विकृत नगरसेपक उद्धवजी मराठे, प्रभाग अध्यक्ष मंदार पवार लिगल सेलचे यश बालीया, कॅन्टोमेंट मतदार संघाचे पदाधिकारी विशाल दरेकर, दिलीप मामा बहिरट, सुवर्णा भरेकर उज्वला गौड, राजेंद्र मलावडे, सुनिल बारणे, शाम पाटसकर संजय ओझा, अनिल पाटील, हर्षल दिघे, मांगीलाल शहा यांच्यासह प्रभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
“ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी व्हावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने हे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सहभागी होत नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
– गणेश बिडकर (सभागृह नेता)
शनिवार (24 जुलै) रविवार (२५ जुलै) ला हे शिबिर झाले. दोन दिवसात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभाग घेत आरोग्य तपासणी केली. तर शंभर नागरिकांच्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस टी) ओळखपत्राची नोंदणी करण्यात आली. या उपक्रमात 275 नागरिकांनी सहभाग घेतला. करोनाच्या नियमाचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल या भागातील अनेक नागरिकांनी कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. आरोग्य तपासणी उपक्रमात मधुमेह तपासणी, रक्तदाब तसेच रक्तगट याची तपासणी करण्यात आली.